Popular Newsस्टेट

चेंबूर आग दुर्घनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जीहर – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चेंबूरमधल्या सिध्दार्थ नगर इथल्या आगीच्या दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि संबंधीत कुटुंबीयांची विचारपूस केली. या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल, तसंच जखमींवर शासनाच्याखर्चानं उपचार केले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल, अशा दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्यादृष्टीनं उपायोजनांचाही आढावा घेतला जाईल.  या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचं काम रखडलं असेल तर, त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले. —सिंक– मुख्यमंत्री.   यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आदी  यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *